भंडारा : मोबाईलच्या ५ दुकानात चोरी
भंडारा, २३ एप्रिल (हिं.स.) : भंडारा शहरात एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी मोबाईलची ५ दुकाने फोडल्याची
भंडारा : मोबाईलच्या ५ दुकानात चोरी


भंडारा, २३ एप्रिल (हिं.स.) : भंडारा शहरात एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी मोबाईलची ५ दुकाने फोडल्याची घटना घडली आहे. यात चोरट्यांनी हजारो रुपयांचे मोबाई फोन आणि इतर साहित्य लंपास केलेय. याप्रकरणावरून शहरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेय. भंडारा शहरातील गजबजलेल्या राजीव गांधी चौक येथे एकाच रात्री पाच हुन अधिक दुकानाचे शटर चोरट्यांनी फोडून चोरी केल्याची घटना घडली. या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून होतेय.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande