गोंदिया : मुरूम तस्करांवर कारवाई
अवैध उत्खनन करणारे 4 ट्रॅक्टर, 1 जेसीबी जप्त गोंदिया, २३ एप्रिल (हिं.स.) : गोंदिया जिल्ह्याच्या सड
गोंदिया : मुरूम तस्करांवर कारवाई


अवैध उत्खनन करणारे 4 ट्रॅक्टर, 1 जेसीबी जप्त

गोंदिया, २३ एप्रिल (हिं.स.) : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये विना परवाना मुरूमाची अवैध रित्या उत्खनन होत आहे. याबाबत गुप्त माहिती उपविभागीय अधिकारी यांना होताच त्यांनी आपल्या टीम सह पहाटे धाड टाकली. यावेळी घटनास्थळाहून 1 जेसीबी 4 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. त्यामुळे सडक अर्जुनी तालुक्यामध्ये अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande