गोंदिया : वाळू व्यवसायिकाची हत्या
गोंदिया, २३ एप्रिल (हिं.स.) : गोंदिया शहारातील रोहीत हरिप्रसाद तिवारी उर्फ गोलू यांची रात्री गोळी
संग्रहित


गोंदिया, २३ एप्रिल (हिं.स.) : गोंदिया शहारातील रोहीत हरिप्रसाद तिवारी उर्फ गोलू यांची रात्री गोळी घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेने वाळू व्ययसायिकात दहशत निर्माण झाली असून अवंती चौकातील सहयोग रुग्णालयासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गोलू तिवारी हा सोमवारी रात्री दुचाकीने तिरोड़ा येथून गोंदियाकडे येत होते. दरम्यान त्यांच्या पाठीमागे एका दुचाकीवर दोन जणांनी त्यांचा पाठलाग करुन गोळीबार केला. दरम्यान गोलू तिवारी यांनी जीव वाचवण्यासाठी आपल्या दुचाकीचा वेग वाढविला. दरम्यान कुडवा चौकापासून काही अंतरावर असलेल्या एका बारसमोर त्यांची दुचाकी स्लिप झाली. आधीच त्यांना गोळी लागली असल्याने आणि दुचाकी स्लिप झाल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला गोलू तिवारीला उपचारासाठी सहयोग हॉस्पिटल येथे दाखल केले. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande