केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मे पर्यंत वाढ
नवी दिल्ली, 23 एप्रिल (हिं.स.) : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केज
केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मे पर्यंत वाढ


नवी दिल्ली, 23 एप्रिल (हिं.स.) : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी केजरीवाल यांची कोठडी 1 एप्रिल ते 15 एप्रिल, त्यानंतर 23 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती. आता दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाच्या आदेशानंतर केजरीवाल यांना 7 मे पर्यंत तुरुंगातच रहावे लागणार आहे.

मद्य धोरण प्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. 22 मार्च रोजी ते राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर झाला, तेथून त्यांना 28 मार्चपर्यंत ईडी रिमांडवर पाठवण्यात आले. येथे 22 एप्रिल रोजी केजरीवाल यांच्या शुगर लेव्हलमध्ये वाढ होत असताना इन्सुलिनची मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने एम्सच्या डॉक्टरांचे एक मंडळ तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मंगळवारी तिहार प्रशासनाने सांगितले की सोमवारी संध्याकाळी त्यांना इन्सुलिन देण्यात आले. अधिका-यांनी सांगितले की, संध्याकाळी 7 वाजता त्यांची साखरेची पातळी 217 वर आल्याने त्यांना कमी डोसचे इन्सुलिनचे दोन युनिट देण्यात आले. एम्सच्या टीमने सांगितले होते की जर पातळीने 200 ओलांडल्यास त्यांना कमी डोसचे इन्सुलिन दिले जाऊ शकते.मद्य धोरण प्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. 22 मार्च रोजी ते राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर झाले, तेथून त्यांना 28 मार्चपर्यंत ईडी रिमांडवर पाठवण्यात आले. त्यानंतर 1 एप्रिलपर्यंत कोठडी वाढवण्यात आली होती. केजरीवाल यांच्याशिवाय बीआरएस नेत्या के कविता आणि अन्य आरोपी चरणप्रीत यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. ईडीने सुनावणीदरम्यान सांगितले की, के कविता यांच्या प्रकरणी 60 दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाईल.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande