गोंदिया : गोलू तिवारी हत्याप्रकरणी 7 आरोपी ताब्यात
गोंदिया, २४ एप्रिल (हिं.स.) : गोंदियातील रोहित उर्फ गोलू हरिप्रसाद तिवारी हत्या प्रकरणी पोलिसांनी अव
संग्रहित


गोंदिया, २४ एप्रिल (हिं.स.) : गोंदियातील रोहित उर्फ गोलू हरिप्रसाद तिवारी हत्या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासात ७ आरोपींना अटक करण्यात आलीय. गोलू तिवारी यांची सोमवारी तिरोडा-गोंदिया मार्गावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या २४ तासाच्या आत ७ आरोपींना ताब्यात घेतला आहे. या सातही आरोपींना २९ एप्रिल पर्यंतपोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्थिक देवाण-घेवाण आणि जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande