नाशिक - बंगला विकत घ्यायला नकार दिल्याने बिल्डरने टाकला दरोडा
नाशिक २५ एप्रिल, (हिं.स.) - आवडलेला बंगला विकत नसल्यामुळे दरोडा टाकून घाबरून बंगला विकत घेण्याचा प्र
नाशिक - बंगला विकत घ्यायला नकार दिल्याने बिल्डरने टाकला दरोडा


नाशिक २५ एप्रिल, (हिं.स.) - आवडलेला बंगला विकत नसल्यामुळे दरोडा टाकून घाबरून बंगला विकत घेण्याचा प्रयत्न येण्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. या प्रकरणांमध्ये बिल्डरसह काही मजुरांना नाशिक पोलीस यांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.

याबाबत पोलीस आयुक्त संदिप कर्णीक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. संदिप भारत रणबावळे,महादेव बाबुराव खंदारे,अरूण उर्फ बबन गायकवाड व बांधकाम व्यावसायीक अजित प्रकाश पवार अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गेल्या मंगळवारी (दि.१६) रात्री ही घटना घडली होती. शशिकुमार माधवराव तपस्वी (७५ रा.तपस्वी बंगला,एचपीटी कॉलेज समोर कॉलेजरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वयोवृध्द तपस्वी दाम्पत्याचे मुले परदेशात आहेत. तपस्वी दाम्पत्य रामनवमी निमित्त पंचवटी येथील काळाराम मंदिरात गेले होते. देवदर्शन करून ते रात्री १० वाजेच्या सुमारास घरी परतले असता ही घटना घडली.

काही वेळाने अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने शशिकुमार तपस्वी काय झाले बघण्यासाठी घराबाहेर पडत असतांना दबाधरून बसलेल्या चार लुटांरूनी त्यांना आतमध्ये ढकलून मारहाण केली. या हल्ल्यात ते जखमी झाले. त्यांना चाकुचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, कर्णफुले, अंगठी असे तीन लाख रुपयांचे दागिने, घरातील ५४ हजाराची रोकड व एक लाख २० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा पावणेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

या घटनेचा झाला उलगडा

या प्रकाराची तपस्वी यांनी आपल्या नातेवाईकांना माहिती दिल्याने वरिष्ठांसह गंगापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. पोलीस यंत्रणा सीसीटीव्ही आणि तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे दरोडेखोरांचा माग काढत असतांनाच युनिटचे कर्मचारी नाझीमखान पठाण आणि आप्पा पानवळ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे या घटनेचा उलगडा झाला.

वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगे महाराज पुलाखाली एमएच १८ ई ६०८९ या स्प्लेंडर दुचाकीवरील संशयित संदिप रणबावळे आणि महादेव खंदारे यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुह्याची कबुली दिली. पोलीस तपासात बांधकाम व्यावसायीकाने वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बंगल्याची जागा मिळविण्यासाठी सुपारी दिल्याचे पुढे आले आहे. या घटनेत बिल्डर सह अन्य तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून एक अल्पवयीन मुलासही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मुळचे करंजी गरड जि.वाशिंद येथील रहिवासी असलेल्या संशयित एकमेकांचे नातेवाईक असून ते शहरातील वेगवेगळया बांधकाम व्यावसायीकांकडे मजूरी काम करतात. त्यातील संदिप रणबावळे याचे बिल्डर अजीत पवार याच्याशी चांगले संबध आहेत.

८ ते १० टक्के कमिशन

बांधकामाच्या ठिकाणी दोघांच्या भेटी होत असल्याने अजित पवार याने तपस्वी बंगल्याचा व्यवहार झाल्यास ८ ते १० टक्के कमिशन देईल अशी ग्वाही दिल्याने वृध्द दाम्पत्यास धमकाविण्यासाठी हा दरोडा टाकण्यात आला. बिल्डर पवार याच्या शहरातील पाईपलाईन रोडवर दोन तर लक्ष्मीनगर भागात एक बांधकाम साईट सुरू असून तपस्वी बंगल्याची जागा त्याच्या नजरेत भरल्याने हा कट रचण्यात आला. कॉलेजरोड सारख्या भागात जागा उपलब्ध झाल्यास व्यवसायात भरभराट होईल या हेतूने त्याने प्रथम वृध्द दाम्पत्याची कौटूंबिक माहिती संंग्रहीत करून काही महिन्यांपूर्वी दलालाच्या माध्यमातून तपस्वी दांम्पत्याची भेट घेतली होती. मात्र तपस्वी यांनी बंगला विक्री करण्यास नकार दिल्याने त्याने मजूराच्या माध्यमातून रॉबरीचा कट आखल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande