नाशिक: वर्गणीच्या वादातून गोळीबार, एक जण गंभीर जखमी
नाशिक २५ एप्रिल, (हिं.स.) - चाडेगांव येथील काशाई देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावातुन जमा करण्य
संग्रहित


नाशिक २५ एप्रिल, (हिं.स.) - चाडेगांव येथील काशाई देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावातुन जमा करण्यात येणाऱ्या लोकवर्गणीचा तसेच मागील वर्षी यात्रेसाठी खर्च झालेला निधी आणि बाकी असलेल्या निधीबाबत विचारणा केल्याचा राग आल्याने चाडेगांव विविध विकास सोसायटीचे सदस्य सचिन मानकर याने गावातील बंडु मानकर याच्यावर गोळीबार केला. यात बंडु मानकर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

चाडेगाव गावात यात्रेनिमित्त बैठक सुरू होती. ती बैठक आटोपल्यानंतर सर्व मित्र मानकर परिवार चाडेगाव फाट्यावरील ओम साई ढाब्यावर पार्टी साठी बसले होते. त्या ठिकाणी संशयित सचिन याने स्वतःकडे असलेल्या गावठी कट्टा मधून 2 गोळ्या जवळच्या मित्र नातेवाइक बंडु मानकर याच्यावर झाडल्या असून जखमी मानकर हा सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाशिकरोड पोलीस करीत आहे.संशयीत आरोपी सचिन मानकर हा हिस्ट्रीसीटर आरोपी असून त्याच्याविरोधात विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल असल्याचे समजते. खंडणी, मारहाण, असे गुन्हे दाखल आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande