आबा कांबळे खून खटल्यात सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
सोलापूर , 26 एप्रिल (हिं.स.) पत्रा तालिम परिसरातील आबा कांबळे याच्या खूनप्रकरणातील आरोपी सुरेश उर्फ
आबा कांबळे खून खटल्यात सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा


सोलापूर , 26 एप्रिल (हिं.स.) पत्रा तालिम परिसरातील आबा कांबळे याच्या खूनप्रकरणातील आरोपी सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे, रविराज दत्तात्रय शिंदे, अभिजीत उर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे, प्रशांत उर्फ आप्पा पांडुरंग शिंदे, निलेश प्रकाश महामुनी, तैसिफ गुडूलाल विजापुरे व नितीन उर्फ ईश्वर भालचंद्र खानोरे यांना न्यायालयाने दोषी धरत न्यायाधीश संगिता आर. शिंदे यांनी सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

आरोपी सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे यांचा मुलगा ऋतुराज शिंदे याचा २००४ मध्ये आबा कांबळे व त्याच्या साथीदारांनी घडवून खून केला होता. मुलाच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने ७ जुलै २०१८ रोजी गामा शिंदे याच्यासह सात जणांनी मिळून आबा कांबळे याचा मोबाईल गल्ली येथे धारदार शस्त्राने खून केला, अशी फिर्याद शुभम श्रीकांत धूळराव यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली होती. हा खटला विशेष सत्र न्यायाधीश संगीता आर. शिंदे यांच्या न्यायालयासमोर चालला. खटल्यात सरकारतर्फे एकूण २८ साक्षीदार तपासण्यात आले. ७ ऑगस्ट २०१९ रोजी सरकार पक्षातर्फे साक्षीदार क्र. एक याचा तपास झाला. या खटल्याचा निकाल आज शुक्रवारी (ता. २६) न्यायालयाने दिला. आज दुपारी एक वाजून १० मिनिटांनी न्यायालयाने आरोपी व त्यांच्या वकिलांसमोर निकालाचे वाचन केले.

सर्व सातही आरोपींना भारतीय दंड विधान कलम ३०२, १२० ब, १४३, १४७, १४८, १४९ व शस्त्र कायदा कलम ४ व २५ नुसार त्यांना दोषी धरले. अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३(२) (व्हीएम) अंतर्गत गुन्हा शाबित झाला नसल्याचे मत नोंदवले. त्यानंतर आरोपींच्या वकिलांना शिक्षेबद्दल काही सांगायचे आहे का, अशी विचारणा करण्यात आली. शिक्षेबद्दल आरोपींतर्फे वकिलांनी युक्तिवाद केला, ‘सदरची घटना ही दुर्मिळातली दुर्मिळ नाही, आरोपी नंबर एक हे ८१ वर्षांचे वयोवृद्ध आहेत तर काही आरोपींना लहान मुले व परिवाराची जबाबदारी आहे, त्यामुळे कमीत कमी शिक्षा देण्यात यावी’ त्यावर सरकारतर्फे युक्तिवाद करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande