मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात अतिशय महत्त्वपूर्ण कामे झालेली आहेत - चंद्रकांत पाटील
सोलापूर , 26 एप्रिल (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात अतिशय महत्त्वप
चंद्रकांत पाटील


सोलापूर , 26 एप्रिल (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात अतिशय महत्त्वपूर्ण कामे झालेली आहेत. त्यामध्ये महिलांसाठी शौचालय, गॅस, मोफत रेशन, पाच लाखांपर्यंत मोफत औषधोपचार आणि प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी,

महिलांना बसमध्ये पन्नास टक्के सवलत, मुलींना शालेय फी माफ इत्यादी कामे केल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत फक्त आणि फक्त मोदींसाठी प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.नातेपुते येथील चैतन्य मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्ष व सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी मनसेचे अप्पासाहेब कर्चे, शिवसेना शिंदे गटाचे सतीश सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुरेश पालवे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, जगात सर्वात मोठा देश भारत असून लोकशाही मानणारा हा देश आहे. आपणास अनेक क्रांतिकारक निर्णय घेण्यासाठी भक्कम सरकारची गरज आहे.

गेल्या दहा वर्षात देशात एकही दंगल, बॉम्बस्फोट झाला का? प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. ही लढत मोहिते पाटील विरुद्ध नाईक निंबाळकर अशी नसून ही देशाच्या अस्मितेची लढत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे त्रिदेव प्रत्येकाचा हिशेब घेण्यास खंबीर आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande