नाशकात वोट फॉर नेशन सायकलॉथॉनला उदंड प्रतिसाद
नाशिक, २८ एप्रिल, (हिं.स.) - सायकलिस्टस् फाउंडेशनचे माजी अध्यक्ष व पावा कन्स्ट्रक्शनचे संचालक राजेंद
नाशकात वोट फॉर नेशन सायकलॉथॉनला उदंड प्रतिसाद


नाशिक, २८ एप्रिल, (हिं.स.) - सायकलिस्टस् फाउंडेशनचे माजी अध्यक्ष व पावा कन्स्ट्रक्शनचे संचालक राजेंद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली वोट फॉर नेशन सायकलिंग चॅलेंज 9 ते 23 एप्रिल दरम्यान देण्यात आले होते. या दरम्यान दररोज कमीत कमी 20 किलोमीटर सायकल राईड बारा दिवस करणे अनिवार्य होते. उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात असूनही 156 सायकलिस्टने हे व्हर्च्युअल चॅलेंज स्वीकारले. सर्व सायकलिस्ट मिळून पंधरा दिवसात 42,756 किलोमीटर सायकलिंग केली. आपल्या आरोग्यासाठी पर्यावरण संवर्धनासाठी तसेच मतदान जनजागृतीसाठी मोलाचे योगदान सर्वांनी दिले. 110 सायकलिस्टस् ने हे चॅलेंज यशस्वीरित्या पूर्ण केले. व मतदान जनजागृतीचा संदेश दिला.

या सर्व रायडर्सचा सन्मान सोहळा पावा ब्लॉसम, येथे आयोजित करण्यात आला. या चॅलेंजचा समारोप करण्यासाठी भव्य सायकलॉथॉनचे आयोजन करण्यात आले. अनंत कान्हेरे मैदान येथे सर्व सायकलिस्ट मोठ्या संख्येने जमले. मनपाच्या विभागीय अधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. गोल्फ क्लब मैदान -मायको सर्कल-सिटी सेंटर सिग्नल-त्रिमूर्ती चौक-मार्गे ही रॅली संभाजी स्टेडियम नवीन सिडको येथे पोहोचली. या ठिकाणी मतदान जनजागृती पर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर करण्यात आले. वोट फॉर नेशन सायकलिंग चॅलेंज पूर्ण करणाऱ्या सायकलिस्टचा सन्मान आकर्षक मेडल देऊन करण्यात आला. यावेळी मनपा नवीन नाशिकच्या विभागीय अधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांनी सामाजिक बांधिलकी जपून सायकलिंग चॅलेंज सोबत मतदान जनजागृती केल्याबद्दल सर्वांचे विशेष कौतुक केले.

या चॅलेंजचे विजेते कैलास भागवत, डॉ. अनिता लभडे, फर्स्ट रनर अप नितीन जाधव ,अश्विनी कोंडेकर, प्रकाश गिरी ,मीरा जोशी यांना आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande