महादेव बेटिंग ॲप : अभिनेता साहिल खानला १ मे पर्यंत पोलीस कोठडी
मुंबई, 28 एप्रिल (हिं.स.) - महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला चार दिवसांची म्हणजे १ मे पर
अभिनेता साहिल खान


मुंबई, 28 एप्रिल (हिं.स.) - महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला चार दिवसांची म्हणजे १ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता, त्यानंतर मुंबई पोलिसांच्या एसआयटीच्या पथकाने त्याला छत्तीसगडमध्ये अटक केली. दरम्यान त्याला आज, रविवारी न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा १ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्तीसगडमधून साहिलला शनिवारी ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणात आता साहिलची मुंबई पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande