मुंबईत तीन कोटी रुपये असलेले वाहन जप्त
- महाराष्ट्रात ४० कोटी, देशात ४,६५० कोटींचा मुद्देमाल जप्त मुंबई, 28 एप्रिल (हिं.स.) - लोकसभा निवडण
cash vehicle seized 


- महाराष्ट्रात ४० कोटी, देशात ४,६५० कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई, 28 एप्रिल (हिं.स.) - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा गैरव्यवहार होऊ नये यासाठी पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क आहेत. अशातच मुंबईतील भांडुपमधून पैशाने भरलेली गाडी सापडली आहे. भांडुपच्या सोनापूर सिग्नलवर मध्यरात्री निवडणूक भरारी पथकाने सुमारे तीन कोटी रुपये ताब्यात घेतले आहेत. याबाबत आयकर विभागासह अन्य यंत्रणा अधिक तपास करत आहेत.

भांडुप पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री सिक्युर कंपनीची गाडी (MH 04 KF 9407) जप्त केली होती. पोलिसांना संशय आल्यामुळे ती व्हॅन ताब्यात घेण्यात आली होती. गाडीमध्ये पैसे होते आणि त्या संदर्भातील कागदपत्रे कमी होती. पोलीस तपासानंतर आढळलं आहे की, ही गाडी रोज एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जात असते, ही गाडी घाटकोपर, मानखुर्दपर्यंत जाते. या संदर्भात पुढील चौकशी सुरु आहे.

आतापर्यंत निवडणूक भरारी पथकाने ईशान्य मुंबईमध्ये ३ कोटी ९३ लाख रुपयांहून अधिक संशयित रक्कम जप्त करत मुलुंड, भांडुप, मानखुर्द, घाटकोपर विभागात कारवाई करण्यात आली आहे. सध्या संशयित व्हॅन आणि त्यातील कर्मचारी यांची पोलीस चौकशी करीत आहेत. ही गाडी एटीएममध्ये पैसे भरण्यास जात असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र पूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत हे पैसे संशयाच्या घेऱ्यात असून पोलिसांच्या ताब्यात आहेत.

महाराष्ट्रात गेल्या ४४ दिवसांत ४० कोटींची रक्कम पकडली आहे. ६९.३८ कोटींचे मौल्यवान धातू जप्त केले आहेत. ३५ लाख लिटर दारु, ७९.८७ कोटींच्या अन्य वस्तू असा ४३१.३४ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. देशभरात गेल्या ७५ वर्षांतील सर्वाधिक रक्कम या निवडणूक काळात आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. एकूण ४ हजार ६५० कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे निवडणूक काळात प्रचारासाठी रोख रकमेची चणचण उमेदवारांना जाणवत आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande