कर्नाटकात काँग्रेसला त्यांच्या पापांची शिक्षा जनताच देईल - पंतप्रधान
बंगळुरू, 28 एप्रिल (हिं.स.) - अलीकडेच हुबळी येथील कॉलेज कॅम्पसमध्ये मुलीसोबत घडलेल्या प्रकाराने देशभ
Karnataka PM Modi


बंगळुरू, 28 एप्रिल (हिं.स.) - अलीकडेच हुबळी येथील कॉलेज कॅम्पसमध्ये मुलीसोबत घडलेल्या प्रकाराने देशभरात हाहाकार माजला आहे. त्या मुलीचे कुटुंब न्यायाची मागणी करत राहिले पण काँग्रेस सरकारने तुष्टीकरणाशिवाय काहीच केले नाही. नेहासारख्या मुलींची काँग्रेससाठी किंमत नाही, काँग्रेसला फक्त आपल्या व्होट बँकेची चिंता आहे. बंगळुरूमधील एका कॅफेमध्ये बॉम्बस्फोट झाला तेव्हाही काँग्रेसने सुरुवातीला त्यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. येथे फक्त गॅस सिलेंडर फुटल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. जनतेच्या डोळ्यात धूळ का फेकत आहे, याचे उत्तर काँग्रेसने द्यावे? जर कायदा व सुव्यवस्था राखली जात नसेल तर काँग्रेसनेही राजकारणातून राजीनामा दिले पाहिजे, असे म्हणत कर्नाटकात काँग्रेसला त्यांच्या पापांची शिक्षा जनताच देईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

कर्नाटकातील बेळगावी, उत्तर कन्नड आणि दावणगेरे येथे रविवारी आयोजित जाहीर सभांना संबोधित करताना, काँग्रेसच्या फुटीरतावादी मानसिकतेबद्दल आणि राजे-महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला. या कार्यक्रमांमध्ये माजी मुख्यमंत्री श्री बी एस येडियुरप्पा, माजी मुख्यमंत्री व हावेरीचे उमेदवार श्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री व धारवाडचे उमेदवार श्री प्रल्हाद जोशी, बेलगावीचे उमेदवार श्री जगदीश शेट्टार, चिक्कोडीचे उमेदवार श्री अण्णा साहेब शंकर जोले, उत्तर कन्नडचे उमेदवार श्री विश्वेश्वर हेगडे कागेरी, दावणगेरे उमेदवार श्रीमती गायत्री सिद्धेश्वरा आदींसह अन्य नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

मोदी म्हणाले की, कर्नाटकात नवीन शैक्षणिक धोरणावर काँग्रेसने बंदी घातली. त्यातून तरुणांचे नुकसान केलेच आहे. बेळगावी येथील आदिवासी बहिणीसोबत जे घडले, चिक्कोडी येथील एका जैन साधूचे झाले हे अत्यंत लाजिरवाणे आहे. आज संपूर्ण देशाला हे समजले आहे की, जिथे जिथे काँग्रेस आली तिथे विनाश घडवून आणला. कर्नाटकातील भाजप सरकारच्या काळात भारतातील थेट परकीय गुंतवणुकीचा मोठा हिस्सा कर्नाटकात येत असे, मात्र काँग्रेसचे सरकार आल्यानंतर सर्व रस्ते व सिंचनाची कामे ठप्प झाली असून वीजपुरवठा खंडित झाल्याने उद्योग व जनता त्रस्त झाली आहे.

मोदी म्हणाले की, आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान बसवेश्वर यांना मानणारे लोक आहोत. शक्तिशाली भारत घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर संघर्ष केला. भगवान बसवेश्वरांनी अनुभव मंडपातून लोकशाहीचा मार्ग दाखवला. गेल्या १० वर्षांत भारत शक्तिशाली झाला आहे आणि देशातील जनतेला त्याचा अभिमान आहे. आज भारत लोकशाहीची जननी म्हणून ओळखला जातो. गेल्या १० वर्षात भारतातील २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत, ज्यामुळे प्रत्येक देशवासीयाचा आत्मविश्वास वाढला आहे. भारताची प्रगती झाली की प्रत्येक भारतीयाला आनंद होतो, पण काँग्रेस देशहितापासून एवढी दूर झाली आहे, कुटुंबाच्या हितात इतकी गुरफटली आहे की त्यांना देशाचे कर्तृत्व आवडत नाही. काँग्रेसनेही एचएएलबाबत संभ्रम पसरवला होता. काँग्रेसनेही कोरोनाच्या काळात भारतात बनवलेल्या लसीला विरोध केला होता आणि त्याला भाजप लसीचे नाव दिले होते. आता काँग्रेसला भारताच्या प्रत्येक यशाची लाज वाटते. आज काँग्रेस ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करून भारताच्या लोकशाहीला जगभर बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस आणि त्यांच्या संपूर्ण गटाला उत्तर दिले आहे. प्रश्न असा पडतो की, काँग्रेस कोणाच्या सांगण्यावरून देशाला घातक असलेल्या गोष्टींवर खोटेपणा पसरवून लोकांच्या विश्वासाला तडा देत आहे? अशा महत्त्वाच्या मुद्द्यावर खोटे बोलून देशाची लोकशाही नष्ट करण्याचा कट काँग्रेसने रचला आहे. काँग्रेसने संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे.

काँग्रेस केवळ एक जागा जिंकण्यासाठी पीएफआय आणि एसडीपीआय सारख्या देशविरोधी आणि दहशतवादी संघटनांना पाठिंबा देत आहे. परंतु भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे काम केले आहे. काँग्रेसने आपला इतिहास आणि स्वातंत्र्यलढा केवळ मतपेटी आणि तुष्टीकरणाच्या दृष्टीकोनातून लिहिला आणि आजही तेच पाप काँग्रेसचे राजपुत्र पुढे करत आहेत.

काँग्रेसच्या राजपुत्राचे वक्तव्य हे मतपेटीचे राजकारण आणि तुष्टीकरणासाठी जाणीवपूर्वक दिलेले विधान असल्याचे पंतप्रधान म्हणाले. काँग्रेसची तुष्टीकरणाची मानसिकता त्यांच्या जाहीरनाम्यातूनही दिसून येते. राहुल गांधी आपल्या व्होट बँक आणि तुष्टीकरणामुळेच राजे – महाराजांविषयी अपशब्द वापरतात आणि त्यांचा अपमान करतात, परंतु भारतात अत्याचार करणाऱ्या नवाब, निजाम, सुलतान आणि सम्राटांबद्दल बोलताना राजकुमारांच्या तोंडाला कुलूप लागते. काँग्रेसला औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत, त्याऐवजी देशातील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या औरंगजेबाचा गौरव करणाऱ्या पक्षाशी आघाडी करते. काँग्रेसला ते आक्रमक आठवत नाहीत ज्यांनी देशभरात लुटमार आणि हत्या केल्या, काँग्रेसला ते नवाब आठवत नाहीत ज्यांनी भारताच्या फाळणीत मोठा वाटा उचलला. राजे-महाराजांविषयी अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेसच्या राजपुत्रांनी हे लक्षात ठेवावे की बनारसच्या राजाने बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली, राणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरांची पुनर्बांधणी करून आमच्या श्रद्धेचे रक्षण केले आणि बडोद्याच्या महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिभा ओळखून त्यांना परदेशात पाठवले होते. या राजे-महाराजांचे योगदान काँग्रेसच्या राजपुत्राला आठवत नाही.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande