पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेचा विश्वास : डॉ. भारती पवार
दिंडोरी, २८ एप्रिल, (हिं.स) - देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम हे जनते
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेचा विश्वास : डॉ. भारती पवार


दिंडोरी, २८ एप्रिल, (हिं.स) - देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम हे जनतेच्या विश्वास असल्यामुळे सर्वांनी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करावे आणि नरेंद्र मोदींवरील आपलं प्रेम आणि स्नेह व्यक्त करावे असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा उमेदवार भारती पवार यांनी केला आहे

लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ भारती ताई पवार यांच्या प्रचारार्थ जानोरी ,मोहाडी, पालखेड येथील ग्रामस्थांच्या भेटी घेऊन महायुती च्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी रस्ते, आरोग्य, पाणी व शिक्षणाच्या सुविधा सरकारच्या माध्यमातून पोहचवण्यात यश प्राप्त झाले असून मोदीजींनी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी मनात विजयाची आस ठेवून मोदीजीच पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी आपले बहुमूल्य योगदान दिले पाहिजे. तसेच ''अब की बार ४०० पार'' चा नारा देत प्रत्येक बूथवर जाऊन मतदारांशी जास्तीत जास्त संपर्क करायला हवे, असे आवाहन या प्रसंगी आमदार धनराजजी महाले यांनी केले.

यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख सुनील पाटिल, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र सोनवणे, सुरेश डोखळे,प्रमोद देशमुख,भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, शिवसेना जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे, बापुसाहेब पाटिल, नरेंद्र जाधव, मनिषा बोडके, योगेश तिडके,सह आदी नागरिक उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande