मी कुणाच्या बापाला ही घाबरत नाही - भुजबळ
नाशिक, २८ एप्रिल, (हिं.स.) - मला कुणी धमकी देण्याची गरज नाही आणि मी कुणाच्या बापालाही घाबरत नाही. उग
मी कुणाच्या बापाला ही घाबरत नाही - भुजबळ


नाशिक, २८ एप्रिल, (हिं.स.) - मला कुणी धमकी देण्याची गरज नाही आणि मी कुणाच्या बापालाही घाबरत नाही. उगाच मला धमकी देऊन खूप मोठा तीर मारला असं चित्र कोणी उभं करू नये, असे स्पष्ट सांगून राज्याचे पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ कुठे म्हणाले की, प्रकाश शेंडगे यांच्यावर झालेला हल्ला हा दुर्दैवी आहे त्याचा मी निषेध करीत आहे.

राज्याचे पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे रविवारी नाशिकमध्ये निवडक पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, प्रकाश शेंडगे हे ओबीसी समाजाचे नेते आहे.त्यांच्या गाडीवरती जो हल्ला झाला तो दुर्दैवी आहे. पण जर एका विशिष्ट समाजाकडून हा हल्ला झाला असेल तर त्याला तसे उत्तर देखील दिले जाईल आणि त्याबाबत नियोजन हे स्वतः शेंडगे करतील, असे स्पष्ट करून भुजबळ पुढे म्हणाले की, असं कोणीतरी म्हटलं की भुजबळ यांनी घाबरून माघारी घेतली आहे. परंतु मी माझ्या बापालाही घाबरत नाही आणि मला धमकून घाबरून कोणी काही प्रचार करत असेल तर त्यांनी तो त्वरित थांबावा कारण घाबरून काम करणे हे मला जमत नाही आणि मी तसं करत नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये विविध ठिकाणी आणि पक्ष संघटनांकडून ओबीसी समाजाचे कार्यकर्ते हे निवडणूक लढवीत आहेत. त्यांना मला जसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतील तसं मी निरोप पाठवून प्रत्यक्ष फोन वरती बोलून त्यांची समजूत काढत आहे आणि त्यांना महायुतीला मजबूत करण्यासाठी म्हणून निवडणूक लढवू नये असा आग्रह देखील करत आहे. यातील बरेच कार्यकर्त्यांनी माझं शब्द ऐकला आहे आणि काही जण हा शब्द ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये देखील आहेत. महायुतीला कुठे गालबोट लागेल असं काम ओबीसी समाजाच्या कुठल्याही व्यक्तीकडून संस्थेकडून होता कामा नये असे सांगून भुजबळ म्हणाले की, माझ्याबरोबर राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने महायुतीचे नुकसान होईल असे वर्तन करू नये असे स्पष्ट करत त्यांच्या जवळचे दिलीप खैरे यांनी जो उमेदवारी अर्ज लिहिला आहे त्यांना शब्दांमध्ये एक प्रकारे इशारा दिला आहे.

जरांगे पाटलांवरती हल्लाबोल करताना छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे पाटलांना कुठलंही सामाजिक आणि सार्वजनिक माहिती नाही. त्या प्रकारचं ज्ञान देखील नाही. नाशिकला म्हणतात ओपन जागेवरती राखीव का उभे राहतात बीडला म्हणतात ओपन जागेवरती राखीव का उभे राहतात त्यांना हे तरी माहिती आहे का की लोकसभा विधानसभा यांची आरक्षण किती काय आहे ती पण त्यांना काही माहिती नाही उगाच झोपेतून उठल्यासारखे काहीतरी बोलायचं आणि काहीतरी वाद निर्माण करायचे एवढेच काम जरांगे करतात ते मोदींपेक्षाही आता मोठे नेते झाले आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande