राहुल गांधींची शुक्रवारी पुण्यात सभा
पुणे, 28 एप्रिल (हिं.स.) पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर
राहुल गांधींची शुक्रवारी पुण्यात सभा


पुणे, 28 एप्रिल (हिं.स.) पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुण्यात सभा होणार आहे. शुक्रवारी (ता. ३) दुपारी चार वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाजवळील (आरटीओ) एसएसपीएमएस संस्थेच्या मैदानात सभा होईल.पुणे, शिरूर व बारामती लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारांचे निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत क्वार्टर गेट परिसरात सभा झाली होती. त्यानंतर धंगेकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची पुण्यात सभा होईल, अशी चर्चा सुरू होती.

गांधींच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात उत्सुकता असल्याने जिल्हा शहर काँग्रेस कमिटीतर्फे जोरदार प्रयत्न करण्यात येत होते. त्यानुसार धंगेकर यांच्यासह बारामती, शिरूर व मावळ मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी गांधींची पुण्यात सभा होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande