लघुउद्योजक आणि शासन एकत्र आल्यास नक्कीच विकास होईल : नारायण राणे
रत्नागिरी, 28 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघुउद्योजक आणि शासन एकत्र आल्या
नारायण राणे


रत्नागिरी, 28 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघुउद्योजक आणि शासन एकत्र आल्यास या भागाचा नक्कीच विकास होऊ शकेल, असे मत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी व्यक्त केले.

रत्नागिरीतील प्रतिष्ठीत आणि बुद्धिजीवी नागरिकांसोबत राणे यांनी औपचारिक बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. त्यासाठीही विशेष प्रयत्न करणार असून आंबा व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यावर जास्त भर दिला पाहिजे. या सोबतच मच्छिमारांसाठी ठोस कायदे करणे गरजेचे आहे. या सगळ्यांसाठी लघुउद्योजक व बुद्धिजीवी लोकांना बरोबर घेवून काम करणे अत्यंत गरजेचे आहे.

बैठकीला रत्नागिरी संस्थात्मक आणि रचनात्मक काम करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. त्यामध्ये गद्रे मरीन कंपनीचे संस्थापक दीपक गद्रे,ॲड. बाबा परुळेकर, स्वामी स्वरूपानंद संस्थेचे ॲड. दीपक पटवर्धन, डॉ. संतोष बेडेकर, ॲड. महेंद्र मांडवकर, उद्योजक राजू जोशी, रेश्मा जोशी, बांधकाम व्यावसायिक वाघधरे, भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह श्रीराम भावे, मुग्धा भट-सामंत आदींचा समावेश होता.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande