ठाणे - कोलशेत येथील नालेसफाईची आयुक्तांनी केली पाहणी
ठाणे, २८ एप्रिल, (हिं. स) : कोलशेत, लोकमान्य सावरकर नगर परिसरातील नालेसफाईच्या कामास सुरूवात झाली अ
ठाणे 


ठाणे, २८ एप्रिल, (हिं. स) : कोलशेत, लोकमान्य सावरकर नगर परिसरातील नालेसफाईच्या कामास सुरूवात झाली असून नालेसफाईची कामे ही विहित मुदतीत पुर्ण करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी संबंधितांना दिले आहेत. तसेच नालेसफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात ठेवून त्यांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरविण्याबाबतच्या सूचनाही कोलशेत येथील नाल्याची पाहणी दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी दिल्या.

कोलशेत येथील नाल्याची पाहणी आयुक्त सौरभ राव यांनी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, तुषार पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदांना ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला असून माजिवडा, लोकमान्यनगर येथील नाल्याच्या सफाईला सुरूवात झाली असून तसेच येत्या एक ते दोन दिवसांत सर्वच प्रभागातील नालेसफाईला सुरूवात होईल असे आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी नमूद केले. कोलशेत येथील नाल्याची पाहणी त्यांनी केली. नाल्यात उतरणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेवून त्यांना हॅण्डग्लोज, बूट, मास्क आदी सर्व साहित्य पुरविण्यात यावे. नालेसफाई करताना त्यातील संपूर्ण गाळ काढला जाईल, तसेच नाल्यात उगवणारी झाडेझुडपे काढण्यात यावीत अशा सूचनाही आयुक्तांनी संबंधित विभागाला दिल्या.

नालेसफाईचे काम हे विहीत वेळेतच पूर्ण होईल याकडे कटाक्ष असावा. नालेसफाईचे पर्यवेक्षण हे काटेकोरपणे करावे, जेणेकरुन पावसाळयात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होणार नाही या दृष्टीने संबंधित ठेकेदाराकडून काम करुन घेण्याचे आदेशही आयुक्त सौरभ राव यांनी संबधित विभागाला नाल्याच्या पाहणी दौऱ्यादरम्यान दिले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande