ठाणे - शिवसेवा मित्र मंडळाच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त स्वरांजलीचे आयोजन
ठाणे, २८ एप्रिल, (हिं.स) ठाणे पुर्वतील शिवसेवा मित्र मंडळाच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त श्री देवी
ठाणे - शिवसेवा मित्र मंडळाच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त स्वरांजलीचे आयोजन


ठाणे, २८ एप्रिल, (हिं.स) ठाणे पुर्वतील शिवसेवा मित्र मंडळाच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त श्री देवी भगवती इव्हेंटस प्रस्तुत, गाजलेल्या नव्या जुन्या हिंदी मराठी गीतांची मैफल स्वरांजली या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १ मे २०२४ रोजी सायंकाळी ठीक ६.३० वाजता शिवनेरी क्रीडांगण,श्री अष्टविनायक चौक, मीठबंदर मार्ग, कोपरी, ठाणे पूर्व ४००६०३ येथे केले आहे, या कार्यक्रमात स्मुग्धा माळी, विद्या शिवलिंग, नेहा नाईक, सचिन मोहिते आणि प्रशांत काळुंद्रेकर हे कलाकार आपली गाणी सादर करणार असून, या कार्यक्रमाचे निवेदन श्री महेंद्र कोंडे यांचे असणार आहे.

कार्यक्रम सर्व संगीतप्रेमी रसिकांसाठी विनामूल्य असून, सर्व रसिकांनी या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद द्यावा असे आवाहन, शिवसेवा मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande