छत्तीसगड : चकमकीत एकूण 10 नक्षलवादी ठार
नारायणूपरच्या अबुझमाडमध्ये उडाली भीषण चकमक नारायणपूर, 30 एप्रिल (हिं.स.) : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेव
संग्रहित


नारायणूपरच्या अबुझमाडमध्ये उडाली भीषण चकमक

नारायणपूर, 30 एप्रिल (हिं.स.) : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील नारायणपूरच्या अबुझमाड परिसरात आज, मंगळवारी सकाळी डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत एकूण 10 नक्षलवादी ठार झाले. यामध्ये 3 महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

अबुझमाडच्या तकामेटा भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री उशिरा शोध मोहिम हात घेतली. हे सैनिक आज, मंगळवारी सकाळी जेव्हा या भागात पोहोचले तेव्हा त्यांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 10 नक्षलवादी ठार झाले असून यात 3 महिला नक्षल्यांचाही समावेश आहे. पोलिस ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे माओवाद्यांचे मोठे कार्यकर्ते उपस्थित होते. घटनास्थळावरून एके-47सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. चकमकीनंतर शोध सुरू आहे. यापूर्वी 16 एप्रिल रोजी कांकेर जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये सुमारे साडेपाच तास चकमक झाली होती. डीआरजी आणि बीएसएफच्या जवानांनी माओवाद्यांच्या अड्ड्यात घुसून त्यांच्या 29 नक्षलवाद्यांना ठार केले होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande