मुंबई उत्तर मतदारसंघातून सहा उमेदवारांचे अर्ज दाखल
मुंबई उपनगर, 30 एप्रिल, (हिं.स.) : 26- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उत्तर या मतदारसंघातू
मुंबई उत्तर मतदारसंघातून सहा उमेदवारांचे अर्ज दाखल


मुंबई उपनगर, 30 एप्रिल, (हिं.स.) : 26- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उत्तर या मतदारसंघातून आज पियुष वेदप्रकाश गोयल (भारतीय जनता पार्टी, एकूण चार अर्ज), जयंत वसंत सुर्वे (भारतीय जवान किसान पार्टी), कमलेशभाई डाह्याभाई व्यास (सरदार वल्लभभाई पटेल पार्टी), सय्यद जुल्फिकार आलम (बहुजन महा पार्टी), अख्तर हुसेन (अपक्ष), बिपिन बच्चूभाई शाह (हिंदू समाज पार्टी) यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande