छत्तीसगडमध्ये 16 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
विजापूर, 30 एप्रिल (हि.स.) : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असलेल्या
छत्तीसगडमध्ये 16 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण


विजापूर, 30 एप्रिल (हि.स.) : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिमेला सातत्याने यश आलेय. राज्यात आज, मंगळवारी 16 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यापैकी अनेक नक्षलवाद्यांवर लक्षावधी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

राज्यात राबविण्यात येत असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिमेदरम्यान, डीआरजी, बस्तर फायटर, एसटीएफ आणि कोब्रा 202, 210 कारीपू 222 वे कॉर्प्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून कॅम्प लावल्यानंतर चकमकीत मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर नक्षलवाद्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्याचीच परिणीती म्हणून आज, मंगळवारी तब्बल 16 नक्षलवाद्यांनी विजापूरचे एसपी डॉ जितेंद्र कुमार यादव, कारीपू विनोद मोहरील, कमांडंट अमित कुमार, अशोक कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव बनकर, यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणांतर्गत या सर्वांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये पीएलजीए बटालियन सदस्य अरुण कडती, रमेश उर्फ मुन्ना हेमला, सुद्रू पूनम, प्याकी करम, प्रमोद ताटी उर्फ छोटू, पक्लू हेमला उर्फ परवेश, लक्ष्मण मान उर्फ उर्स अली, आयतू पूनम उर्फ वर्गेश, बुधराम पोटम बुधू ताटी उर्फ गधाडा, लखू ताटी, विद्या, रमेश पुनेम, सुखराम हेमला उर्फ रामलू, सुक्कू लेकम उर्फ मांझी, सुक्कू तंटी यांचा समावेश आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande