दिल्ली-एनसीआरमधील शाळांना बॉम्ब स्फोटाची धमकी
नवी दिल्ली, 01 मे (हिं.स.) : दिल्ली-एनसीआरमधील अनेक शाळांना आज, बुधवारी बॉम्बने उडवून देण्याची धमकी
संग्रहित


नवी दिल्ली, 01 मे (हिं.स.) : दिल्ली-एनसीआरमधील अनेक शाळांना आज, बुधवारी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. दिल्ली पब्लिक स्कूल (द्वारका), संस्कृती स्कूल, मदर मेरी स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल नॉयडा आणि दिल्ली पब्लिक स्कूल (आरके पुरम) यांना धमकीचे ईमेल आले आहेत. तसेच काही ठिकाणी धमकीचे फोन गेल्याची माहिती देखील पुढे आलीय.

बॉम्ब स्फोटांची धमकी मिळाल्यावर अनेक शाळांनी खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांनी परत घरी पाठवले आहे. याबाबत माहिती मिळताच डॉग स्कॉड आणि दिल्ली पोलीस संबंधित शाळांमध्ये पोहोचले. शाळा परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. परंतु, दुपारी 12 वाजेपर्यंत पोलिसांना संशयास्पद असे काहीही आढळून आलेंले नाही. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी सांगितले की, प्रारंभिक तपासानुसार कालपासून आतापर्यंत अनेक शाळांना ई-मेल पाठवण्यात आले आहेत. सर्वांचा पॅटर्न सारखाच दिसून येत आहे. ईमेलमध्ये तारखेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे मेल अनेक ठिकाणी पाठवण्यात आलाय असा होतो. सध्या याप्रकरणी आम्ही अधिक तपास करत आहोत. परंतु, अजूनपर्यंत कुठेही संशयास्पद असे काहीही आढळून आलेले नाही. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी नागपूरसह विविध विमानतळांना देखील बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर नागपूर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलीय.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande