कमर्शिअल गॅस सिलेंडर 19 रुपयांनी स्वस्त
नवी दिल्ली, 01 मे (हिं.स.) : सरकारी तेल कंपन्यांनी आज, बुधवार 1 मे पासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिं
संग्रहित


नवी दिल्ली, 01 मे (हिं.स.) : सरकारी तेल कंपन्यांनी आज, बुधवार 1 मे पासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 19 रूपयांची घट केलीय. त्यामुळे 19 किलोच्या कमर्शिअल एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1745 रुपये 50 पैसे झाली आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आजपासून देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 19 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. मात्र, या कपातीचा लाभ केवळ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरच मिळणार आहे. यावेळीही घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.तेल विपणन कंपनी इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, 1 मे पासून राजधानी दिल्लीत 9 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 19 रुपयांनी (दिल्ली एलपीजी किंमत) कमी झाली आहे आणि त्याची किंमत 1764.50 रुपयांवरून 1745.50 रुपयांवर आली आहे. त्याचप्रमाणे, मुंबईतील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1717.50 रुपयांवरून 1698.50 रुपयांवर आली आहे. चेन्नईमध्येही हा सिलेंडर 19 रुपयांनी स्वस्त झाला असून त्याची किंमत 1930 रुपयांवरून 1911 रुपयांवर आली आहे.

मागील महिन्यातही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. गेल्या 1 एप्रिलपासून 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 35 रुपयांनी कमी करण्यात आली होती. त्याआधी सलग 3 महिने व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ होताना दिसत होती.घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती मार्च महिन्यात कमी झाली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त (8 मार्च रोजी) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली होती. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 7 मार्चला केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडरच्या बाबतीत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाने 31 मार्च 2025 पर्यंत पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये सबसिडीची घोषणा केली होती.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande