अयोध्या : राष्ट्रपतींनी घेतले श्रीरामांचे दर्शन
अयोध्या, 01 मे (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, बुधवारी अयोध्येला जाऊन रामललाचे दर्शन
राष्ट्रपतींनी घेतले श्रीरामांचे दर्शन


अयोध्या, 01 मे (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, बुधवारी अयोध्येला जाऊन रामललाचे दर्शन घेतले. श्रीरामांचे दर्शन घेतल्यानंतर त्या संध्याकाळच्या आरतीतही सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रपतींनी संध्याकाळी आपला बराच वेळी मंदिरात घालवला. त्यापूर्वी त्यांनी हनुमान गढीचे दर्शन घेऊन सरयू तीरावर आरतीही केली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, बुधवारी अयोध्या दौऱ्यावर होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळावर पोहोचल्या. जेथे त्यांचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी स्वागत केले. विमानतळावरून राष्ट्रपती अयोध्या धामला रवाना झाले. विमानतळ ते अयोध्याधामपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. यावेळी त्यांनी हनुमानगढी आणि श्रीराम मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी पुजारी राजू दास यांनी राष्ट्रपतींना चांदीची गदा, चांदीचा राम दरबार आणि गायीची प्रतिकृती दिली. हनुमानगढीला भेट दिल्यानंतर राष्ट्रपती शरयू नदी काठच्या आरती स्थळी पोहोचल्या. यावेळी त्यांनी महाआरतीत सहभाग नोंदवला. यावेळी त्यांच्यासह राज्यपाल आनंदी बेन पटेल आणि उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सूर्य प्रताप शाही उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande