भंडारा : प.स.सभापतींसह सर्वांचा मासिक बैठकीवर बहिष्कार
भंडारा, ०१ मे (हिं.स.) :मासिक सभा घेऊनही त्यात मांडलेल्या विषयांवर तोडगा काढला जात नाही. गावागावातील
भंडारा : प.स.सभापतींसह सर्वांचा मासिक बैठकीवर बहिष्कार


भंडारा, ०१ मे (हिं.स.) :मासिक सभा घेऊनही त्यात मांडलेल्या विषयांवर तोडगा काढला जात नाही. गावागावातील समस्या घेऊन आलेल्या सदस्यांच्या समस्यांवर समाधान निघत नसल्याने आज भंडारा पंचायत समितीच्या मासिक सभेवर पदाधिका-यांसह सर्व सदस्यांनी बहिष्कार टाकला. जोपर्यंत जुन्या समस्यांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत सभेला उपस्थित न राहण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. या संदर्भातील ठरावही घेण्यात आला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande