गोंदिया - हिरडामाली नाल्यात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह
गोंदिया, 2 मे, (हिं.स) :- गोंदिया कोहमारा राष्ट्रीय महामार्गावरील हिरडामाली नाल्यात अज्ञात इसमाचा मृ
गोंदिया - हिरडामाली नाल्यात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह


गोंदिया, 2 मे, (हिं.स) :- गोंदिया कोहमारा राष्ट्रीय महामार्गावरील हिरडामाली नाल्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. सदर प्रकार हत्या की आत्महत्या याविषयी माहिती मिळू शकली नाही. गेल्या दोन ते तीन दिवसापासून सदर मृतदेह हिरडामाली नाल्याच्या खाली पाण्यात पडून असल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळावरून वर्तविला जात आहे. महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनाम्याला सुरुवात केली. गेल्या दोन ते तीन दिवसापासून मृतदेह हिरडामाली नाल्याखाली पडून असल्याने परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले. यासंदर्भात अज्ञात इसमाची हत्या ही आत्महत्या असावी यासंदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. हत्या की आत्महत्या याविषयी गुढ कायम असून पोलिसांच्या तपासाअंती अज्ञात इसम कोण ? आणि कुठला आहे. त्याची हत्या झाली की आत्महत्या या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande