मलकापूर : मतदानासाठी आठवडी बाजार रद्द
बुलडाणा, 2 मे (हिं.स.) : रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या लोकसभा मत
मलकापूर : मतदानासाठी आठवडी बाजार रद्द


बुलडाणा, 2 मे (हिं.स.) : रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा क्षेत्रातील मलकापूर आणि नांदुरा तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्या मतदान होणार असल्याने सोमवार 13 मेचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या संपूर्ण निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. या क्षेत्रात कोणताही कायदा भंग होऊ नये, आचारसंहितेचे पालन होण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी संबंधीत गाव, शहरामध्ये मुख्य मार्गावर रस्त्यावर आठवडी बाजार भरतो. आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिक बाजार खरेदी करण्यासाठी येत असतात. तसेच आजुबाजूचे गावातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होण्याची, तसेच मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे जिल्हादंडाधिकारी यांना बाजार व जत्रा अधिनियम, 1862 च्या कलम 5 नुसार मलकापूर विधानसभा मतदारसंघाममध्ये 13 मे रोजी कायदा व सुव्यवस्था, तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही यासाठी आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहे. सदर आठवडी बाजार त्या पुढील दिवशी भरविण्याची मुभा देण्यात आली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande