पाकिस्तान काँग्रेससाठी प्रार्थना करतोय- पंतप्रधान
आणंद, 02 मे (हिं.स.) : पाकिस्तानी नेते काँग्रेसच्या विजयासाठी प्रार्तना करीत आहेत. तसेच पाकिस्तान यु
नरेंद्र मोदी, पंतप्रधान


आणंद, 02 मे (हिं.स.) : पाकिस्तानी नेते काँग्रेसच्या विजयासाठी प्रार्तना करीत आहेत. तसेच पाकिस्तान युवराजाला पंतप्रधान बनवण्यासाठी उत्सुक असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरुवारी केली. गुजरातच्या आणंद येथे आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय आणि पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे समर्थन करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता आणि भाजपवर निशाणा साधला होता. फवाद चौधरीने हा व्हिडिओ ट्विटर हँडलवर पोस्ट केला आणि 'राहुल ऑन फायर' अशी टिप्पणी लिहीली. पाकिस्तानी नेते फवाद चौधरीच्या या सोशल मीडिया पोस्टवरून पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील निवडणूक रॅलीत राहुल गांधींवर निशाणा साधला. सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, योगायोग बघा, आज भारतात काँग्रेस कमकुवत होत आहे. म्हणजे सूक्ष्मदर्शकातूनही काँग्रेस शोधणे कठीण होत चालले आहे. पण गंमत म्हणजे इथे काँग्रेस मरत आहे आणि तिथे पाकिस्तान रडत आहे. यावरून तुम्हाला हे कळले असेलच की आता पाकिस्तानी नेते काँग्रेससाठी प्रार्थना करत आहेत. पाकिस्तान राजकुमारला पंतप्रधान करण्यासाठी आतुर आहे. काँग्रेस पाकिस्तानची चाहती असल्याचा आरोप मोदींनी केला.

पाकिस्तान आणि काँग्रेसमधील ही भागीदारी आता पूर्णपणे उघड झाली आहे. देशाच्या शत्रूंना आज भारतात मजबूत सरकार नको आहे. त्यांना कमकुवत सरकार हवे आहे. देशाच्या शत्रूंना 2014 पूर्वीचे सरकार हवे आहे. आपल्या देशात काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना पाकिस्तान मोठा होत गेला. पाकिस्तानच्या दहशतवादाचे टायर पंक्चर झाले आहेत. ज्या देशाने कधीकाळी दहशतवाद्यांची निर्यात केली होती, तो देश आता घरोघरी भीक मागत फिरतो आहे. पूर्वी काँग्रेसचे कमकुवत सरकार त्यांच्या हातील डोजियर द्यायचे आणि सांगायचे कि आम्ही पाकिस्तानला डोजियर दिले आहे. परंतु, आत्ताचे मजबूत सरकार डोजियर बनवण्यात वेळ वाया घालवत नाही. आम्ही दहशतववाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारतो असे मोदी यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande