कर्नाटकातील धार्मिक आरक्षण मान्य नाही- शरद पवार
कोल्हापूर, 02 मे (हिं.स.) : कर्नाटकात धर्माच्या आधारावर दिलेले धार्मिक आरक्षण मान्य नसल्याचे प्रतिपा
शरद पवार


कोल्हापूर, 02 मे (हिं.स.) : कर्नाटकात धर्माच्या आधारावर दिलेले धार्मिक आरक्षण मान्य नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार केले. कोल्हापूर येथे आज, गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी एका प्रश्नाचा अनुषंगाने बोलताना पवार म्हणाले की, धर्माच्या आधारावर आरक्षण ही संकल्पना आम्हाला मान्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही असा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्याविरोधातही लढू. पवार म्हणाले, आम्ही जातीनिहाय जनगणनेबद्दल बोलत आहोत, जेणेकरून समाजातील वंचित घटकांची संख्या कळण्यास मदत होईल, जे अजूनही मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या त्यांच्या सभांमध्ये आरक्षणाच्या कर्नाटक मॉडेलचा ठळकपणे उल्लेख केला होता आणि म्हटले होते की, काँग्रेस आणि इंडी आघाडी अनुसूचित जाती आणि ओबीसींच्या आरक्षणावर दरोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे. या भाषणाचा ओबीसी समाजावर काय परिणाम होईल याचा अंदाज बांधून शरद पवार यांनी आज धर्माच्या आधारे आरक्षणाला चुकीचे म्हटले आहे.

महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका घेण्यावरही शरद पवार यांनी आज प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, पंतप्रधानांना प्रचाराची जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी येथे पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या जातात. त्यांना महाराष्ट्राला पुन्हा पुन्हा भेट देण्याची संधी मिळो. पंतप्रधान त्यांच्या सभांमध्ये मूलभूत मुद्द्यांवरून लक्ष विचलित करणाऱ्या मुद्द्यांवर बोलत आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची नावे घेतल्याशिवाय पंतप्रधानांचे समाधान होत नाही असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande