पुढच्या आठवड्यात मावळात केंद्र आणि राज्यातील नेते, मंत्र्यांच्या तोफा धडाडणार
पुणे 2 मे (हिं.स) महायुतीत मावळ लोकसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे श
पुढच्या आठवड्यात मावळात केंद्र आणि राज्यातील नेते, मंत्र्यांच्या तोफा धडाडणार


पुणे 2 मे (हिं.स)

महायुतीत मावळ लोकसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुती आणि आघाडीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. पुढच्या आठवड्यात मावळात केंद्र आणि राज्यातील नेते, मंत्र्यांच्या तोफा धडाडणार आहेत.महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, शशिकांत शिंदे यांच्याबरोबरच शेकापचे आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक मैदानात उतरणार आहेत.संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी उध्दव ठाकरे यांची ८ मे रोजी सांगवी येथे सभा होणार आहे. यावेळी शरद पवार, नाना पटोले हेही उपस्थित राहणार आहेत. युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई , सुषमा अंधारे, ठाकरे गटातील नेते नितीन बानगुडे-पाटील यांच्या सभेचे आयोजन केले आहे. शशिकांत शिंदे, चंद्रकांत हंडोरे यांच्याही सभा होणार आहेत. आमदार रोहित पवार, आदित्य ठाकरे यांचे ‘रोड शो’ होणार आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande