ठाणे - पंचकन्याच्या हस्ते पूजन करून आंबा महोत्सवाचे उदघाटन
ठाणे, २ मे, (हिं.स) प्रतिकुल परिस्थितीत महाकष्टाचे काम करून कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आपल्याकडे य
ठाणे 


ठाणे, २ मे, (हिं.स) प्रतिकुल परिस्थितीत महाकष्टाचे काम करून कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आपल्याकडे येतात. या, शेतकऱ्याना मदतीचा हात देण्याबरोबरच शहरवासियांना अस्सल आंबा पुरवण्याचे काम गेली १७ वर्षे आंबा महोत्सवाच्या माध्यमातुन सुरू आहे. तेव्हा, शेतकऱ्यांच्या या चळवळीला बळ देण्यासाठी ठाणेकरांनी आंबा महोत्सवाला अवश्य भेट द्यावी. असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले. बुधवारी महाराष्ट्र दिनी चिमुकल्या पंचकन्याच्या हस्ते पूजन करून आंबा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच,संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने १ मे ते १२ मे या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदानात भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी आ. केळकर बोलत होते. यावेळी, सौ.कमल संजय केळकर, आ.निरंजन डावखरे, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम,सचिव सचिन पाटील, मनोहर सुगदरे, व्यापारी सेलचे मितेश शहा, भाजयुमो अध्यक्ष सुरज दळवी, सचिन केदारी, समतोलचे विजय जाधव आदी उपस्थित होते. यावेळी आ. केळकर यांनी कोकणातील शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्यासाठी ही चळवळ सुरू ठेवल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून ऋषी देसाई यांनी मालवणी भाषेत आंबा महोत्सवाचे गा-हाणे घातले. तर, आ. निरंजन डावखरे आणि केशव उपाध्ये यांनी देखील आंबा महोत्सवाच्या चळवळीचे कौतुक करीत शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande