रत्नागिरी : दुहेरी हत्ये प्रकरणी एका संशयिताला अटक
रत्नागिरी, 4 मे, (हिं. स.) : पावस परिसरातील गाेळप मुसलमानवाडी येथे दाेन नेपाळी भावांच्या खुनाचा छडा
संग्रहित


रत्नागिरी, 4 मे, (हिं. स.) : पावस परिसरातील गाेळप मुसलमानवाडी येथे दाेन नेपाळी भावांच्या खुनाचा छडा लावण्यात पाेलिसांना यश आले आहे. या दाेन भावांच्या खूनप्रकरणी पाेलिसांनी गाेळप येथे आंबा बागेत काम करणाऱ्या एक गुराख्याला अटक केली आहे.

सरणकुमार ऊर्फ गोपाळ क्षतीराम विश्वकर्मा (५८, रा. टिकापूर, जि. कैलाली, नेपाळ) असे संशयित खुन्याचे नाव आहे. त्याने तत्कालीक कारणातून हा खून केल्याचे पाेलीस तपासात पुढे आले आहे.

खडकबहादूर बलराम थापा क्षेत्री (७२), भक्तबहादूर बलराम थापा क्षेत्री (६७, दाेघेही रा. लम्की चुहा, चौरीपूर, कैलाली, नेपाळ) या दाेघांचा २९ एप्रिल राेजी मध्यरात्री खून करण्यात आला हाेता. ३० एप्रिल राेजी सकाळी हा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी आंबा बागायतदार मालक मुसद्दिक मुराद मुकादम यांनी फिर्याद दिली हाेती. त्यानुसार पूर्णगड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.

या गुन्ह्याचा तपास रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर करत आहेत. या खूनप्रकरणातील आराेपीचा शाेध घेण्याची सूचना पाेलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केली हाेती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने या घटनास्थळाची पाहणी केली हाेती.

हा खून माहीतगार व्यक्तीने केल्याची खात्री झाल्यानंतर आजूबाजूच्या नेपाळी गुरख्यांची कसून चौकशी करण्यात आली. या चाैकशीत सरणकुमार ऊर्फ गोपाळ क्षतीराम विश्वकर्मा याने या दाेघांचा खून केल्याचे समाेर आले. त्याने तत्कालीक कारणावरून दोघांना ठार मारल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, योगेश खोंडे, पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धायरकर यांनी ही कामगिरी केली. सहायक पाेलीस फाैजदार पांडुरंग गोरे, पाेलीस हवालदार सुभाष भागणे, विनोद कदम, शांताराम झोरे, नितीन डोमणे, विजय आंबेकर, बाळू पालकर, सागर साळवी, अमित कदम, योगेश नार्वेकर, सत्यजित दरेकर, योगेश शेट्ये, दीपराज पाटील, गणेश सावंत, प्रवीण खांबे, पोलीस नाईक दत्तात्रय कांबळे, अतुल कांबळे यांचा या कारवाईत सहभाग हाेता.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande