कर्नाटक : रेवन्नाच्या अटकेसाठी मागितले सीबीआयचे सहकार्य
नवी दिल्ली, ४ मे (हिं.स.) : जनता दल (एस) चे नेते प्रज्वल रेवन्ना यांचा शोध घेण्यासाठी कर्नाटक सरकारन
प्रज्वल रेवन्ना


नवी दिल्ली, ४ मे (हिं.स.) : जनता दल (एस) चे नेते प्रज्वल रेवन्ना यांचा शोध घेण्यासाठी कर्नाटक सरकारने सीबीआयला इतर देशांची मदत घेण्याचे आवाहन केले आहे. रेवन्नावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना रेवन्नाविरोधात सुरू असलेल्या तपासाबाबत माहिती दिली. या बैठकीनंतर सीबीआयशी संबंधित हे पाऊल उचलण्यात आले आहे.

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातून प्रज्वल रेवन्ना याचे नाव सेक्स स्कँडलमध्ये आलेय. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रज्वल देश सोडून जर्मनीला निघून गेला. याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहिले आहे. पीडितांना संरक्षण मिळावे आणि या प्रकरणात जो कोणी आरोपी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश राहुल गांधींनी दिले आहेत. या पत्रात राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले आहे की, त्यांनी भाजप नेते देवराज गौडा रेवन्ना यांची माहिती केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दिली होती. असे असतानाही त्यांना तिकीट देण्यात आले. हे धक्कादायक आहे. ही बाब पंतप्रधान मोदींच्या निदर्शनास आणून देऊनही त्यांनी त्यांच्या बाजूने प्रचार केला हा त्यांच्यासाठी आणखी एक धक्का असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने जाणीवपूर्वक प्रज्वलला भारतातून पळून जाण्यास मतद केली. हरियाणातील कुस्तीपटू आणि मणिपूरमधील घटनांबाबत पंतप्रधान मोदींनी मौन पाळले आहे. माता-भगिनींच्या हितासाठी लढणे हे काँग्रेस पक्षाचे नैतिक कर्तव्य असल्याचे राहुल यांनी म्हंटले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande