सैन्याच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग
सांगली, 04 मे (हिं.स.) : हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सांगली येथे आज, शनिवारी इमर्जन्सी
सैन्याच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग


सांगली, 04 मे (हिं.स.) : हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सांगली येथे आज, शनिवारी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. हे हेलिकॉप्टर नाशिकहून कर्नाटकच्या बेंगळुरूला चालले होते. दरम्यान या हेलिकॉप्टरमध्ये असलेले सैन्याचे 3 जवान सुखरूप आहेत.

भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरमध्ये आज, शनिवारी अचानक बिघाड झाला. नाशिकहून बेंगळुरूला जात होती. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक दोष वैमानिकाच्या लक्षात आला. यानंतर, महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एरंडोली गावातील एका शेतात तातडीने उतरवण्यात आले. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह भारतीय लष्कराचे तीन जवानही होते. भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर अचानक शेतात उतरल्याचे पाहून गावकऱ्यांनी हेलिकॉप्टरला घेराव घातला. चौपर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तत्काळ गावकऱ्यांना पांगवले. हेलिकॉप्टरमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी लष्कराचे पथक नाशिकहून रवाना झाले.

यासंदर्भात सैन्य अधिकाऱ्यांकडून मिळालेल्य माहितीनुसार लष्कराच्या जवानांना वैद्यकीय साहित्यासह रसद पुरवण्यासाठी हेलिकॉप्टर नाशिकहून बेंगळुरूला जात होते. यादरम्यान अचानक हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यानंतर सकाळी 11.30 वाजेच्या सुमाराला शेतात आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आले. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व सैनिक पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande