जळगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला २० वर्षाची शिक्षा
जळगाव, 4 मे, (हिं.स.) चोपडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्
जळगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला २० वर्षाची शिक्षा


जळगाव, 4 मे, (हिं.स.) चोपडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या ४५ वर्षीय इसमावर दाखल गुन्ह्यात अमळनेर न्यायालयाने आरोपीला २० वर्षांची शिक्षा सुनावली असून ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. चोपडा तालुक्यातील एका गावात ही घटना घडली होती. या घटनेत आरोपीने सन-२०२० साली १६ वर्षीय पीडितेचे आई-वडील हे घरी नसल्याचा गैरफायदा घेऊन वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. यामुळे सदर मुलगी ही अत्याचारातून गर्भवती झाल्यामुळे सदर प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला सदर पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, पिडीतेचे जळगाव येथील बालकल्याण समिती कार्यालयात येथे समुपदेशन करण्यात आले. त्यानुसार अमळनेर न्यायालयात संशयित आरोपी ज्ञानेश्वर रामदास कोळी (वय ४५) याच्याविरोधात खटला चालविण्यात आला. जिल्हा न्यायाधीश पी. आर. चौधरी यांच्यापुढे सदर खटल्याचे कामकाज चालले. खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी आणि पीडित तरुणी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष, तपासणी अधिकारी पोलीस संदीप आराख यांचा तपास महत्त्वाचा ठरला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande