जळगावात बंद घर फोडून चोरट्यांचा ६९ हजारांच्या मुद्देमालावर डल्ला
जळगाव , 4 मे (हिं.स.) फळविक्रेत्याचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे, चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण
जळगावात बंद घर फोडून चोरट्यांचा ६९ हजारांच्या मुद्देमालावर डल्ला


जळगाव , 4 मे (हिं.स.) फळविक्रेत्याचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे, चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शहरातील सुरेश नगर येथील लाईफ स्टाईल रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सुरेश नगरात लाइफस्टाइल रेसिडेन्सी येथे विलास मुरलीधर चौधरी वय-४८ हे वास्तव्याला आहे. फळ विक्री करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेपासून ते गुरूवार २ मे रोजी रात्री १०.३० वाजेपर्यंत त्यांचे घर बंद होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच ४५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. विलास चौधरी हे घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. यावेळी घरातील सर्व सामान अस्तव्यस्त पडलेला दिसून आला. त्यांनी दुसऱ्या दिवशी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्यादी त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे हे करीत आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande