जालना : उमेदवारांना विविध परवानगीसाठी एक खिडकी योजना कक्ष
जालना, 4 मे (हिं.स.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवार त्यांचे प
जालना : उमेदवारांना विविध परवानगीसाठी एक खिडकी योजना कक्ष


जालना, 4 मे (हिं.स.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांना प्रचार विषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोईचे व्हावे, या करीता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथील अभिलेख विभाग, तळ मजला येथे एक खिडकी योजना कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी परवानगी कक्ष सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर स्थापन करण्यात आले आहेत. तरी उमेदवारांना विविध परवानगी तात्काळ उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी सोहम वायाळ यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली आहे.

जिल्हास्तरीय निवडणुक निर्णय अधिकारी तसेच सहा निवडणुक स्तरावरील एक खिडकी योजनेतील आदेशित पोलिस अधिकारी, परिवहन अधिकारी, महसूल अधिकारी, जिल्हा परिषद अधिकरी, महावितरण अधिकारी, सावर्जनिक बांधकाम अधिकारी इत्यादी यांनी परवाना कक्षामध्ये पूर्ण वेळ हजर राहावे. रात्री उशिरापर्यंत बसून त्या दिवशी आलेले अर्ज त्याच दिवशी निकाली काढावेत. अर्जदार यांना कागदपत्रासाठी लागणारे कागदपत्रे, अर्ज कसा करावा इत्यादीबाबत उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीला मार्गदर्शन करणे, इत्यादी सर्व सूचना आज घेण्यात आलेल्या दुरचित्रवाणी (व्हिसी) मध्ये एकुण सहा विधानसभा मतदारासंघातील नोडल अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. तसेच एक खिडकी योजनेबाबत काही तक्रारी असल्यास निवासी उपजिल्हाधिकारी जालना तथा जिल्हा नोडल अधिकारी सोहम वायाळ यांना 02482-225502 या दुरध्वनीवर संपर्क साधावा.

जिल्हास्तरीय, तालुका स्तरावरुन एक खिडकी कक्षातून एकुण 18 प्रकारचे परवाने देण्यात येत असून आजपर्यंत जिल्हास्तरीय स्तरावरुन 42 परवाने व तालुकास्तरावरुन 180 असे एकुण 222 परवाने निर्गमीत करण्यात आले आहेत. परवाना कक्षाचे अनुषंगाने आज निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी सोहम वायाळ यांच्या अध्यक्षतेखाली 18-जालना लोकसभा मतदार संघ, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जालना, बदनापुर, भोकरदन, सिल्लोड , फुलंब्री व पैठण येथील विविध परवानाबाबत नोडल अधिकारी यांच्याशी व्हीसीव्दारे बैठक घेवुन वेळेत परवाने निर्गमीत करण्यात यावे तसेच परवाना कक्ष विहीत वेळेत चालु ठेवून परवाने देण्याबाबत सुचित करण्यात आले.

भारत निवडणुक आयोगाने, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभागी होणा-या उमेदवारांसाठी सुविधा पोर्टल (सुविधा कॅडिडेट ॲप) विकसीत केलेले आहे. त्याव्दारे उमेदवार सभा, रॅली, हस्तपत्रके, कटआऊट, स्पिकर्स इत्यादी परवानगी घेण्यासाठी पोर्टलचा उपयोग करु शकतात. सदरील अॅप भारत निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर (http:uvidha.eci.gov.in) गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असून, उमेदवार, प्रतिनिधी, पक्ष प्रतिनिधी हे सदर पोर्टल अॅपमध्ये मोबाईल ओटीपी अधारे नोंदणी करुन आवश्यक त्या परवानग्या उपलब्ध करुन घेवू शकतात. विविध परवानग्यासाठीचे आवश्यक नमुने उक्त पोर्टलवर उपलब्ध आहेत. तसेच विविध परवानग्यासाठी वितरीतकरणारे अधिकारी व त्यासाठी लागणारे ना-हरकत प्रमाणपत्र याबद्दलची माहिती तसेच सहा. निवडणुक निर्णय अधिकारी यांच्यास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या एक खिडकी परवानगी कक्षाची माहिती देण्यात आलेली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande