सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज
सातारा, 4 मे (हिं.स.) : 45 सातारा लोकसभा मतदार संघ अंतर्गत २५९ कराड उत्तर विधानसभा मतदार संघ लोकसभा
सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज


सातारा, 4 मे (हिं.स.) : 45 सातारा लोकसभा मतदार संघ अंतर्गत २५९ कराड उत्तर विधानसभा मतदार संघ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची तयार अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.

45 सातारा लोकसभा मतदार संघासाठी निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे आहेत. तसेच 259 कराड उत्तर विधानसभा मतदार संघासाठी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, उपजिल्हाधिकारी (महसूल) सातारा व अतिरिक्त सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी विजय पवार, तहसिलदार कराड हे आहेत. 259 कराड उत्तर विधानसभा मतदार संघाची मतदार संख्या खालील प्रमाणे आहे.

259 कराड उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये 1 लाख 51 हजार 511 पुरुष मतदार, 1 लाख 45 हजार 427 स्त्री मतदार, इतर 7 अशी एकूण 2 लाख 96 हजार 945 मतदार संख्या आहे. 2 हजार 310 सैनिक मतदार आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदार संघात लोकसभेसाठी 339 मतदान केंद्रावर मतदान होणार आहेत. यासाठी 338 बीएलओ, 376 केंद्राध्यक्ष, 377 सहायक केंद्राध्यक्ष, 800 इतर मतदान अधिकारी, 379 शिपाई, 19 माईक्रो ऑब्झर्व्हर, 14 जलद प्रतिसाद पथके, याप्रमाणे अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 139 मतदान केंद्राचे वेबकास्टींगद्वारे व्हिडिओ शुटींग करण्यात येणार आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांचे दोन प्रशिक्षणे पार पडली असून 6 मे रोजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल, कराड येथे तिसरे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

7 मे रोजी रोजी जास्तीतजास्त मतदारांनी मतदान करावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी वेगवेगळ्या मतदान केंद्राची रचना करणेत आलेली आहे. यामध्ये 2 महिला मतदान केंद्रे (142-रहिमतपुर, 225-उंब्रज), 2 युवा मतदान केंद्रे (146-साप, 186-मसुर), 1 परदानशीन मतदान केंद्र (269-वाघेरी), 1 दिव्यांगद्वारा संचलित मतदान केंद्र(129-अपशिंगे), 3 क्रिटीकल मतदान केंद्रे (ASD आधारे) (120-जायगाव, 236-चरेगांव, 64-डफळवाडी),1 आदर्श - सांस्कृतिक वारसा (44-अपशिंगे) मतदान केंद्राचा समावेश आहे.

पुर्ण मतदान प्रक्रिया सुरक्षाकामी पोलिस उपअधिक्षक, पोलिस निरीक्षक, सहा. पोलिस निरीक्षक, पोलिस उप निरीक्षक, पोलिस कर्मचारी व होमगार्ड, केंद्रिय सशत्र पोलिस दल तुकडी, राज्य सशत्र पोलिस दल तुकडी, सशस्त्र रक्षक तुकडी कार्यरत राहणार आहेत.

निवडणुक कालावधीमध्ये आचारसंहितेचे कामकाज सुव्यवस्थित चालू राहणेसाठी 5 फिरते पथक, 5 स्थिर पथक, 4 व्हिडीओ सर्व्हेलंस पथक व 2 व्हिडीओ व्हीव्हींग पथक कार्यरत करण्यात आलेली आहेत. निवडणुकीदिवशी एकुण 56 बस व 6 क्रुजर जीपमार्फत सर्व पथके मतदान केंद्रावर रवाना करणे व परत आणण्यासाठी तयार करणेत आलेली आहेत. 7 मे रोजी 44 सेक्टर ऑफिसर व 14 जलद प्रतिसाद पथकांमार्फत कोणत्याही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था करणेत येणार आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ, तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा विक्रांत चव्हाण यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande