मुंबई-भुवनेश्वर दरम्यान ४ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या
मुंबई, 4 मे (हिं.स.) : मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात अतिरिक्त गाड्यांच्या प्रवाशांच्या गरजेला प्रतिस
संग्रहित


मुंबई, 4 मे (हिं.स.) : मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात अतिरिक्त गाड्यांच्या प्रवाशांच्या गरजेला प्रतिसाद म्हणून, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि भुवनेश्वर दरम्यान ४ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस - भुवनेश्वर साप्ताहिक विशेष ट्रेन

गाडी क्र. 08419 साप्ताहिक विशेष शुक्रवारी १० आणि १७ मे २०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १३:२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १:४५ वाजता भुवनेश्वर येथे पोहोचेल. तसेच गाडी क्र. 08420 साप्ताहिक विशेष बुधवार ८आणि १५ मे २०२४ रोजी भुवनेश्वर येथून रात्री ११ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १०:३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, सेरम, तांडूर, लिंगमपल्ली, बेगमपेट, सिकंदराबाद, पगिडिपल्ली, गुंटूर, विजयवाडा जंक्शन, एलूरु, टाडेपल्लीगुडेम, निडदवोलू, राजमंडी, सामलकोट,पिठापुरम, तुनी, अंनकापल्ली, दुव्वाडा, सिंम्हाचलम, पेन्दुर्ति, कोत्तवलासा विझियानगरम, श्रीकाकुलम रोड, पलासा, सोमपेटा, इच्छापुरम, ब्रह्मपुर, छत्रपुर, बालुगाँव आणि खोरधा रोड येथे थांबे देण्यात आलेय. गाडीत २ वातानुकूलित द्वितीय, तीन वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन असे एकूण २१ डबे असणार आहेत. या विशेष ट्रेन क्रमांक 08419 चे बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह आधीच सुरू आहे.विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande