डोंबिवली : रेल्वे अपघातात तरुणाचा मृत्यू
डोंबिवली, ०४ मे (हिं.स.) : रेल्वे अपघातातात एका १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार
डोंबिवली : रेल्वे अपघातात तरुणाचा मृत्यू


डोंबिवली, ०४ मे (हिं.स.) : रेल्वे अपघातातात एका १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानका दरम्यान घडली. या अपघाताची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मैनुद्दीन जैनुद्दीन शहा असे रेल्वे अपघातातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव असून तो भिवंडीत राहत होता. शनिवारी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान या तरुणाचा मृतदेह पोलिसांना सापडला. या तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला कि लोकलच्या धडकेत मृत्यू झाला याचा तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande