भिवंडी मतदारसंघात 36 उमेदवारांची 43 नामनिर्देशनपत्रे वैध, 5 उमेदवारांचे अर्ज अवैध
ठाणे, 4 मे (हिं.स.) - 23- भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिय
भिवंडी मतदारसंघात 36 उमेदवारांची 43 नामनिर्देशनपत्रे वैध, 5 उमेदवारांचे अर्ज अवैध


ठाणे, 4 मे (हिं.स.) - 23- भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शनिवार दि 04 मे 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता पार पडली. या छाननी प्रक्रियेत 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात 5 अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता निवडणुकीत 36 उमेदवारांचे 43 नामनिर्देशनपत्रे वैध ठरले आहेत, अशी माहिती 23-भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.

23 - भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवार दि. 03 मे 2024 रोजी दुपारी 03.00 वाजता संपली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर 23, भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 41 उमेदवारांनी आपले 48 अर्ज दाखल केले होते. या सर्व नामनिर्देशन अर्जाची शनिवार, दि. 04 मे 2024 रोजी छाननी करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाचे 23 भिवंडी लोकसभेचे सर्वसामान्य निरीक्षक श्री. राजनविर सिंग कपूर (आयएएस) हे उपस्थित होते. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सर्व अर्जांची 23- भिवंडी लोकसभा मतदार संघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी छाननी केली.

23, भिवंडी लोकसभा मतदारसंघात 36 उमेदवारांचे 43 अर्ज वैध तर 05 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.

23, भिवंडी लोकसभा मतदारसंघात अवैध ठरलेले उमेदवार :- 5

1) शमशुद्दीन शेख - बळीराजा पार्टी

2, देवेश पाटील - अपक्ष

3) विठ्ठल कांबळे - अपक्ष

4) वारस्मिया दादुमिया शेख- पिस पार्टी

5.मोहम्मद खान अक्रम - अपक्ष

वैध अर्ज केलेल्या उमेदवारांना दि. 06 मे 2024 रोजी दु.3.00 वाजेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande