नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी भूकंप
रिश्टर स्केलवर 2.5 तीव्रतेची नोंद नागपूर, 04 मे (हिं.स.) : नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी आज, शनिवारी 4
संग्रहित


रिश्टर स्केलवर 2.5 तीव्रतेची नोंद

नागपूर, 04 मे (हिं.स.) : नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी आज, शनिवारी 4 मे रोजी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.4 इतकी नोंदवण्यात आली. शहरात शुक्रवारी 3 एप्रिल रोजी देखील 2.5 तीव्रतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात आज, शनिवारी दुपारी 2 वाजून 24 मिनीटांनी 2.4 तीव्रतेचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. या भूकंपाचे केंद्र जमीनीच्या 5 किमी जमिनीच्या आंत होते. यापूर्वी शुक्रवारी दुपारी 3 वाजून 11 मिनिटांनी या धक्क्यांची नोंद झालीय. नागपूर परिसरात 2.5 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. मात्र, भूकंपाची 2.5 रिश्टर स्केल श्रेणी भीतीदायक नसल्याचे मत अभ्यासकांनी नोंदवलेय. नागपुरलगतच्या काही भागासह मध्यप्रदेश, आंध्र, तेलंगणाचा काही भाग हा भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून मोडतो. यापरिसरात शुक्रवारी 3 वाजून 11 मिनिटांनी या धक्क्यांची नोंद झालीय. उत्तर नागपुरातील सिललेवाडा हे या भूकंपाचे केंद्र होते. तर ही घटना धोकादायक नसून अशा प्रकारचे भूकंप होत असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी, 27 मार्च रोजी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने नागपूर जिल्ह्यात 3 लहान भूकंपाची नोंद केली होती. त्यावेळी हिंगणा येथील झिलपी तलावाजवळ दुपारी 2.53 वाजता 2.8 तीव्रतेचा पहिला धक्का बसला. त्यानंतर दुपारी 3 वाजेच्या सुमारास कांद्रीजवळील परसोनी येथील खेडी गावातही सौम्य धक्क्यांची नोंद झाली होती.

नागपूर परिसरात येणाऱ्या भुकंपाच्या सौम्य धक्क्यांचे कारण इथल्या कोळसा खाणी असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले. कोळसा काढल्यानंतर रिकाम्या खाणीत नदीचे पाणी भूगर्भात गेल्यामुळे जमिनीच्या आतल्या बाजुला असलेले खडकांचे थर खचतातत्यामुळे जमीनीच्या खाली हालचाली होऊन असे धक्के बसतात. त्यासोबतच अवैध ब्लास्टिंगमुळे भूकंप तरंग निर्माण होऊन धक्के बसत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande