बेळगावात काँग्रेस उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून वीस लाख रुपये जप्त
- पाच जणांविरोधात गुन्हा दाखल बेळगाव, 5 मे (हिं.स.) - बेळगावचे काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यां
cash seized 


- पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

बेळगाव, 5 मे (हिं.स.) - बेळगावचे काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात येत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून वीस लाख रुपये जप्त केले आहेत. भाजप समर्थकांनी ५ जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी गोकाक पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गोकाक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यासाठी पैसे वाटप करण्यास येत होते. लोकसभा मतदारसंघातील मतदारांना वाटण्यासाठी एका कार्यकर्त्याच्या घरात लाखो रुपये ठेवले होते. या पैसे वाटप मोहिमेची माहिती भाजपा कार्यकर्त्यांना समजताच घरोघरी प्रत्येकी एक हजार रुपये वाटणाऱ्या पाच जणांना पैशांसह रंगेहात पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. याशिवाय एका कारमध्ये काँग्रेस उमेदवाराची पत्रके आणि पैसेही पोलिसांनी जप्त केले आहेत. यामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत गोकाकमधून काॅंग्रेसचे पराभूत उमेदवार डाॅ. महांतेश कडाडी, भद्रावती येथील दोन युवक, हर्षा साखर कारखान्यात काम करणारे दोन कर्मचारी यांचा समावेश आहे. या संदर्भात अधिक चौकशी सुरू आहे.

भाजपने बेळगावमधून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांना उमेदवारी दिली आहे. मतदारसंघातील लिंगायत समाजाचे प्राबल्य पाहून काँग्रेसने महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांना तिकिट दिले आहे. त्यामुळे गेल्या २० वर्षांत प्रथमच भाजपपुढे तगडे आव्हान उभे राहिले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande