रत्नागिरीतील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर डॉ. शाश्वत शेरे यांचे शनिवारी मार्गदर्शन
रत्नागिरी, 5 मे, (हिं. स.) : येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा मासिक स्नेहमेळावा शनिवार,
रत्नागिरीतील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर डॉ. शाश्वत शेरे यांचे शनिवारी मार्गदर्शन


रत्नागिरी, 5 मे, (हिं. स.) : येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा मासिक स्नेहमेळावा शनिवार, दि. ११ मे रोजी सायंकाळी ४ वाजता श्रीराम मंदिरात होणार आहे.

यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शाश्वत शेरे ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यावेळी एप्रिल व मे महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे सत्कार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कट्ट्याचे मुख्य संयोजक सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये आणि सचिव सुरेंद्र घुडे यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande