गोदरेज अप्लायन्सेसने जिंकले अँटी लीक स्प्लिट एअर कंडिशनर टेक्नॉलॉजीचे पेटंट
मुंबई, 5 मे (हिं.स.) गोदरेज ॲण्ड बॉयसची व्यवसायिक शाखा गोदरेज अप्लायन्सेसला गोदरेज लीक प्रूफ स्प्लिट
गोदरेज अप्लायन्सेसने जिंकले अँटी लीक स्प्लिट एअर कंडिशनर टेक्नॉलॉजीचे पेटंट


मुंबई, 5 मे (हिं.स.) गोदरेज ॲण्ड बॉयसची व्यवसायिक शाखा गोदरेज अप्लायन्सेसला गोदरेज लीक प्रूफ स्प्लिट एअर कंडिशनर्समधील त्यांच्या अँटी लीक टेक्नॉलॉजीसाठी पेटंट मंजूर करण्यात आले आहे. हा भारतातील पहिला आणि एकमेव स्प्लिट एसी असून लीकी एसींच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्याचे डिझाइन करण्यात आले आहे.

अंदाजे ८५% एसी ग्राहकांना एसी सुरू असतानाच्या काळात एकदा तरी गळती होत असलेल्या एसींचा त्रास होतो आणि परिणामी, ही समस्या एसीच्या प्रमुख समस्यांपैकी एक आहे. खोलीच्या आत एसी मधून पाणी गळणे हा एक त्रासदायक अनुभव असतो. त्यामुळे भिंत खराब होऊ शकते आणि एकूणच खोलीचे सौंदर्य बिघडते. दिसताना वाईट दिसण्याबरोबरच आणखी धोकादायक गोष्ट म्हणजे त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते आणि सुरक्षिततेच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. गोदरेज लीक प्रूफ स्प्लिट एसी मध्ये अंतर्भूत केलेल्या अँटी-लीक तंत्रज्ञानाचा या सर्व समस्यांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी उपाय सादर करण्याचा उद्देश आहे. या एसी मध्ये 5-इन-1 कन्व्हर्टेबल कूलिंग टेक्नॉलॉजी, आय-सेन्स टेक्नॉलॉजी, इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी यांसारखी इतर अनेक प्रगत वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान देखील आहे.

या कामगिरीवर भाष्य करताना गोदरेज अँड बॉयसचा भाग असलेल्या गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, “पेटंट करण्यायोग्य नवकल्पना तयार करण्यासाठी अथक विचार, प्रयत्न, परिश्रमपूर्वक चाचणी अशा अनेक गोष्टी आवश्यक असतात. आमच्या लीक प्रूफ स्प्लिट एसींमध्ये असलेल्या आमच्या अँटी लीक टेक्नॉलॉजीला हे पेटंट मिळाले याचा आम्हाला आनंद होत आहे. या पेटंटने आमच्या महत्वपूर्ण प्रयत्नांचे रक्षण केले आणि आमची टेक्नॉलॉजी वैशिष्ट्यपूर्ण राहील हे सुनिश्चित केले. ‘सोच के बनाया है’ या आमच्या ब्रॅंडच्या तत्वज्ञानाशी जुळणारी ही पावती आहे आणि नाविन्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी आम्हाला सतत प्रेरणा देते.”

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande