आमचे सरकार व्यापाऱ्यांना जीएसटीमध्ये सूट देणार - नाना पटोले
पुणे, 5 मे (हिं.स.) : जीएसटीमध्ये वारंवार बदल केले जात आहे. व्यापाऱ्यांची छळवणूक होत आहे. भाजपच्या ख
आमचे सरकार व्यापाऱ्यांना जीएसटीमध्ये सूट देणार - नाना पटोले


पुणे, 5 मे (हिं.स.) : जीएसटीमध्ये वारंवार बदल केले जात आहे. व्यापाऱ्यांची छळवणूक होत आहे. भाजपच्या खोट्या आश्वासनाला व्यापारी वैतागले आहेत. आमचे सरकार व्यापाऱ्यांना जीएसटीमध्ये सूट देईल. तसेच जाचक कायद्यात बदल करून त्यांची छळवणूक थांबवू, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आश्वासन दिले. तसेच व्यापारांसाठी मोठे गोडाऊन उभारण्यात येतील, असे देखील यावेळी सांगितले. यावेळी व्यापाऱ्यांनी रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा देऊन ‘अब की बार, काँग्रेस की सरकार’ असा नारा यावेळी दिला.

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ सहकार नगर ते मार्केटयार्ड मोटारसायकल रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथील व्यापाऱ्यांशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संवाद साधला. सायंकाळी 4 वाजता सहकार नगर येथून मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली.

रॅलीत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आम आदमी पार्टी व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या तर्फे ही रॅली आयोजित करण्यात आली. रॅलीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम-आदमी पार्टी यांचे झेंडे मोटारसायकला लावण्यात आले होते. फटाक्यांचा दणदणाट आणि रविंद्र धंगेकर यांच्या विजयाच्या घोषणांचा जय घोष करण्यात आला. नाना पटोले यांनी दुचाकीचे सारथ्य करीत माजी उपमहापौर आबा बागुल त्याच्या समवेत बसले होते. कार्यकर्त्यांनी रविंद्र धंगेकरयांच्या विजयाच्या घोषणा देऊन सारा परिसर दणाणून सोडला. तसेच मार्केट यार्डातील सर्व व्यापाऱ्यांशी त्यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

ही रॅली दी पूना मर्चंट चेंबर येथे समाप्त झाली. माजी उपमहापौर आबा बागुल, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, अमित बागुल, अमित भगत, मुक्तार शेख, हेमंत बागुल, संतोष पाटोळे, रमेश सोनकांबळे, रमेश पवार, गोरख मरगळ, विश्वास दिघे, अशोक नेटके, जयकुमार ठोंबरे पाटील यांच्यासह आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नाना पटोले यांनी दि पुन्हा मर्चंटचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठीया, सचिव ईश्वर नहार, आशिष दुगडे, नवीन गोयल, श्याम लढा, उत्तम बाठीया, संदीप शहा, सुहास जोशी, आशिष नहार, आदी व्यापाऱ्यांशी संवाद साधला.

नाना पटोले म्हणाले, गत दहा वर्षांच्या काळात जीएसटी कायद्याच्या माध्यमातून देशातील नागरिकांना लुटण्याचे काम केले जात आहे. सार्वजनिक उपक्रम विक्री करुन देशाला कंगाल केले जात आहे. केंद्र सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड चीड आहे. त्यामुळे यावेळी भाजपचा पराभव अटळ आहे. भाजपच्या खोट्या आश्वासनाला व्यापारी वैतागले आहेत. या मेळाव्यास व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande