पनवेल ते मडगाव, सावंतवाडी विशेष रेल्वेगाड्या
रत्नागिरी, 5 मे, (हिं. स.) : उन्हाळी हंगामात सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घे
पनवेल ते मडगाव, सावंतवाडी विशेष रेल्वेगाड्या


रत्नागिरी, 5 मे, (हिं. स.) : उन्हाळी हंगामात सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक ०११५८ मडगाव ते पनवेल विशेष रेल्वेगाडी ६ मे रोजी सकाळी ६ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी पनवेल येथे सायंकाळी ६.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५७ पनवेल- मडगाव विशेष रेल्वेगाडी पनवेल येथून ८ मे रोजी पहाटे ४ वाजता निघेल. ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. या गाडीला करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा येथे थांबा आहे. या रेल्वेगाडीला २० एलएचबी डबे असून त्यातील १० शयनयान, ८ सामान्य आणि दोन एसएलआर डबे असतील.

गाडी क्रमांक ०११५९ पनवेल- सावंतवाडी रोड विशेष रेल्वेगाडी ६ मे रोजी रात्री ८ वाजता पनवेल येथून निघेल. दुसऱ्या दिवशी ती गाडी सावंतवाडीला सकाळी ६ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६० सावंतवाडी रोड- पनवेल विशेष गाडी ७ मे रोजी सायंकाळी ४ वाजता सावंतवाडीहून निघेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता पनवेलला पोहोचेल. या गाडीला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबा असेल. या गाडीला २० एलएचबी डबे असून यामधील १० शयनयान, ८ सामान्य आणि दोन एसएलआर डबे असतील.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande