नरेश म्हस्के यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊ - हेमंत म्हात्रे
ठाणे, 5 मे (हिं.स.) ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आज भाज
नरेश म्हस्के यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊ - हेमंत म्हात्रे


ठाणे, 5 मे (हिं.स.) ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आज भाजपाच्या वर्तकनगर येथील मुख्यालयात भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी आणि मंडळ अध्यक्ष यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत नरेश म्हस्के यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. तर काही गैरसमज होते ते आता दुर झाले असून नरेश म्हस्के यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊ, अशी ग्वाही भाजपाचे ओवळा माजिवडा मंडळ अध्यक्ष अॅड. हेमंत म्हात्रे यांनी दिली.

महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचाराची पुढील दिशा ठरविण्यासाठी एक बैठक भाजपाचे शहर अध्यक्ष संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या बैठकीत जेष्ठ नेते मनोहर डुंबरे, जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील, मनोहर सुगदरे, डॉ. समीरा भारती, विलास साठ्ये, भाजपाचे ओवळा माजिवडा मंडळ अध्यक्ष अॅड. हेमंत म्हात्रे, वर्तकनगर अध्यक्ष संतोष जैयस्वाल, लोकमान्यनगर अध्यक्ष निलेश पाटील, मध्य अध्यक्ष दिलीप कंकाळे, नौपाडा अध्यक्ष विकास घांग्रेकर, इंदिरानगर अध्यक्ष दया यादव, वागळे इस्टेट अध्यक्ष सचिन सावंत, कोपरी अध्यक्ष शिवाजी रासकर आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित नरेश म्हस्के यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रचाराची पुढील दिशा ठरविली. अॅड. हेमंत म्हात्रे यांचे काही असलेले गैरसमज भाजपा पदाधिकाऱ्यांनी यावेळी दूर केले. तसेच विजयाचा जल्लोष आतापासूनच सुरु केल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande