ठाणे - नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या १५० जणांची समन्वयकांची टीम
ठाणे, 5 मे, (हिं.स.) ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना प्रचंड बहुमतांनी विज
ठाणे - नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या १५० जणांची समन्वयकांची टीम


ठाणे, 5 मे, (हिं.स.) ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्यासाठी आणि त्यांच्या प्रचार नियोजनासाठी ६ विधानसभा क्षेत्रातील विविध मित्र पक्षांच्या १५० प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून टीम बनविण्यात आली आहे. रविवार पासून हे समन्वयक नरेश म्हस्के यांच्या विजयासाठी नियोजन करणार असल्याची माहिती एका बैठकीत देण्यात आली.

भाजपाच्या वर्तकनगर येथील मुख्यालयात आज दुपारी ठाणे, कोपरी-पांचपाखाडी, ओवळा-माजिवडा, मीरा भाईंदर, ऐरोली, बेलापूर या ६ विधानसभा क्षेत्रातील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांचे प्रमुख 150 पदाधिकाऱयांची समन्वयक म्हणून पहिली संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रचाराची दिशा, जाहीर सभा, प्रचार साहित्य यांचे नियोजन कसे करायचे याबाबत युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपिठावर शिवसेना विधानसभाप्रमुख राम रेपाळे, राजेंद्र फाटक, हेमंत पवार, संघटक अशोक वैती, सचिव विलास जोशी, संजय भोईर, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, मिरा भाईंदर जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा, स्नेहा पाटील, मनोहर डुंबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, मीरा भाईंदर अध्यक्ष अरुण कदम, मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे, रवींद्र मोरे, महिला अध्यक्षा समिक्षा मार्कंडे, रिपाईचे भास्कर वाघमारे, महेश खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

१५० जणांच्या समन्वयकांचा व्हाट्स उप ग्रुप बनविला असून मतदानापर्यंत समन्वयकांनी सुट्टी घेऊ नये, सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करावा, दुपारी १ ते ४ मान्यवरांच्या बैठका घ्याव्या, बूथ लेव्हल आणि मतदार यादीवर काम करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.

नरेश म्हस्के यांनीही बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. नरेंद्र मोदींना देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. तर मला लोकसभेत आपले प्रतिनिधीत्व करण्याची संधी द्यायची असल्याने समन्वयकांनी प्रचाराचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande